नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रसारभारतीनं कालबाह्य झालेल्या दूरदर्शनच्या प्रादेशिक एनॉलॉग प्रसारणाला सेवेतून बाद करायला सुरुवात केली आहे. यामुळे नव्या तंत्रज्ञानाचा मार्ग प्रशस्त होईल, तसंच नव्या आशयाला संधी उपलब्ध होणार आहे. दूरदर्शनच्या डायरेक्ट-टू-होम या मोफत सेवेद्वारे डीडी-फ्री-डीशच्या माध्यमातून १५० पेक्षा अधिक दूरदर्शन वाहिन्या प्रेक्षक सध्या मोफत बघू शकतात. यात दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या आणि विविध खासगी तसंच शैक्षणिक वाहिन्यांचा समावेश आहे. आपल्या कोणत्याही शंकांचं निरसन करण्यासाठी ०११-२५८०६२०० या क्रमांकावर प्रेक्षक कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत प्रेक्षक संपर्क साधू शकतात.