नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा गाठण्यात कोविन मंचाची भूमिका महत्त्वाची राहिली असल्याचं राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कोवीन मंचाचे प्रमुख डॉ. आर. एस . शर्मा यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. लसीकरणाची संपूर्ण प्रक्रिया पद्धतशीर आणि सुरळीता ठेवण्यात मंचाचं महत्तवपूर्ण योगदान असल्याचं ते म्हणाले. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचंही त्यांनी कौतुक केलं. कोविड १९ प्रतिबंधक लसींचा १०० कोटी मात्रांचा ऐतिहासिक टप्पा गाठल्याबद्दल आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी एक गाण्याचं अनावरण केलं. नवी दिल्लीतल्या लाल किल्यावर एका ध्वनिचित्रफितीचं अनावरणही त्यांनी केलं.