नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीर मधल्या हस्तकला आणि इतर कलांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली असून श्रीनगरचा समावेश युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये करण्यात आला आहे. याबद्दल आनंद व्यक्त करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीनगरच्या चैतन्यपूर्ण संस्कृतीसाठी ही नेमकी ओळख असल्याचं प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं. हा निर्णय, केंद्र शासित प्रदेशातील कलाकार आणि विणकरांसाठी अंतिम मान्यता असल्याचं श्रीनगरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी म्हटलं आहे.