पुणे : किमान ४ ते ५ महिन्यांपूर्वी लसीची पहिली अथवा दुसरी मात्रा घेतलेल्या व्यक्तींमध्ये निर्माण झालेल्या प्रतिपिंडाची सध्याची नेमकी परिस्थिती काय आहे याबद्दलची माहिती उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं पुणे शहरात नव्यानं सेरो सर्वेक्षण करण्याची मागणी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी केली आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून पुण्यात सेरो सर्वेक्षण झालेलं नाही त्यामुळं ज्यांनी किमान ५ ते ६ महिन्यांपूर्वी लसीची दुसरी मात्र घेतली किंवा केवळ पहिलीच मात्रा घेऊन दुसऱ्या मात्रेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं त्यांच्या शरीरात किती प्रमाणात प्रतिपिंड शिल्लक आहेत अथवा नाहीत याबद्दलची नेमकी माहिती गोळा करण्यासाठी नव्यानं सेरो सर्वेक्षण करण्याची गरज असल्याचं भारतीय वैद्यकीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं भविष्यात पुण्याला कोरोनाचा धोका कितपत राहील याबद्दलचा अंदाज बांधता  येणार आहे.