मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरुच आहे. संपावर तोडगा निघावा यासाठी राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केल्यानंतर काल ४१ टक्के वेतनवाढ जाहीर केली. त्यानंतर भाजपानं संपातून पाठिंबा काढून घेतला आहे. वेतनवाढ आणि वेळेवर पगार व्हावा ही कर्मचाऱ्यांची मागणी होती, त्याबाबत सरकारनं काल घोषणा केली आहे, त्यामुळे आपण मुंबईत आझाद मैदानावरचं आंदोलन मागं घेत आहोत, असं भाजपा नेते गोपिचंद पडळकर आणि कामगार नेते सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मान्य नसून एसटीचं शासनामध्ये विलीनीकरण व्हावं अशी आग्रही मागणी त्यांनी लावून धरली आहे. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत लढा संपणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. दुसरीकडे राज्य शासनानं कामावर हजर न होणाऱ्या कर्मचार्यांनवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.