नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओडिशातल्या चांदीपूर किनाऱ्यावर आज ब्राह्मोस सुपर सोनिक क्षेपणास्त्राच्या नव्या आवृत्तीचे सुखोई ३० या सुपरसोनिक लढाऊ विमानाद्वारे सफल परीक्षण करण्यात आलं. हा ब्राह्मोस सुपर सोनिक क्षेपणास्त्राच्या विकासातील महत्वाचा टप्पा आहे. हे क्षेपणास्त्र भारतीय तंत्रज्ञान वापरून देशातच तयार करण्यात आलं आहे.  या सफल परीक्षणाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय  हवाई  दल आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेला शुभेच्छा दिल्या आहेत.