मुंबई (वृत्तसंस्था) : आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरणी राज्या लोकसेवा आयोगाला या सगळ्या परीक्षा पुन्हा घेणं अवघड आहे. त्यामुळे शासनानं घेतलेले निर्णय स्वीकारलं पाहिजे, असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. ते आज पुणे इथं बोलत होते. ज्याच्या चुका असतील त्याच्यावर कारवाई केली जाईल,एवढी कडक कारवाई केली जाईल की परत कोणी असं करण्याची हिंमत करणार नाही, असंही उपमुख्यमंत्री म्हणाले. जिल्ह्यात 100 टक्के नागरिकांनी कोरोना प्रतिबंधीत लसीची पहिली मात्रा घेतली आहे. लसीची दुसरी मात्रा घेण्यासाठी लोकांना प्रोत्साहीत करण्यासाठी प्रशासनानं पावलं उचलावीत अशा सुचनाही पवार यांनी केल्या.