मुंबई : वारंवार दुष्काळ पडत असल्याने निर्माण होणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील मौजे धांदरफळ बु., मौजे जवळेकडलग, मौजे निमगांव भोजापूर व इतर ३ गावांच्या नळ पाणीपुरवठा योजनेस मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत मौजे धांदरफळ बु., ता.संगमनेर, जि.अहमदनगर नळ पाणी पुरवठा योजनेस ५३१.७६ लक्ष (निव्वळ), व ५७३.१४ लक्ष (ढोबळ)  इतकी अंदाजपत्रकीय रक्कम नमूद करण्यात आली आहे. यासाठी उपलब्ध स्त्रोताद्वारे पाणीपुरवठा उपलब्ध होणार असून मौजे धांदरफळ बु. नळ पाणीपुरवठा प्रस्तावित योजनेसाठी प्रवरा नदीच्या डाव्या तीरावर अस्तित्वात असलेल्या पाझर विहीर निवडण्यात आली आहे. प्रस्तावित येाजनेतून ४० लिटर प्रती माणसी पाणी  उपलब्ध होणार आहे.

मौजे जवळेकडलग नळ पाणीपुरवठा योजनेस रुपये ८२३.४७ लक्ष (निव्वळ) व रुपये ८८८.२९ लक्ष (ढोबळ) इतकी अंदाजपत्रकीय रक्कम नमूद करण्यात आली आहे. यासाठी उपलब्ध स्त्रोताद्वारे पाणीपुरवठा उपलब्ध होणार असून जवळेकडलग गावाची लोकसंख्या तपासून साठवण तलाव नळपाणीपुरवठा योजनेसाठी घेण्यात आले आहे. तसेच प्रवरा नदीच्या डाव्या तीरावर विहीर हा स्त्रोत पाणीपुरवठ्यासाठी निवडण्यात आला आहे. नवीन प्रस्तावित योजनेतून ४० लिटर प्रती माणसी पाणी उपलब्ध होणार आहे.जवळेकडलग गाव प्रवरा नदीच्या तिरावर वसलेले असून प्रवरा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा आर्वतन काळ संपल्यानंतर पाणी कमी पडते. गावाची वाढीव लोकसंख्या व वाड्या वस्त्यांना पाणी पुरवठा करणे आवश्यक आहे.

मौजे निमगांव, भोजापूर व इतर ३ गावे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेस रुपये १३९३.८६ लक्ष (निव्वळ) व रुपये १५०४.५२ लक्ष (ढोबळ) किंमतीच्या अंदाजपत्रकास  शासनाने मान्यता दिली आहे. यासाठी येथील अस्तित्वातील उपलब्ध स्त्रोतांद्वारे  नळ पाणीपुरवठा योजना राबविली जाणार असून या योजेनसाठी अहमदनगर जिल्ह्यातील आढळा धरणाची निवड करण्यात आली आहे. नवीन प्रस्तावित योजनेनुसार प्रती माणसी 40 लिटर एवढे पाणी उपलब्ध होणार आहे.

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या सन २०१९-२० च्या मंजूर कृती आराखड्यामध्ये या योजनांचा समावेश करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील मौजे लासुर्णे नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील मौजे लासुर्णे नळ पाणीपुरवठा योजेनेसाठी रुपये 941.28 लक्ष व रुपये 1016.92 लक्ष (ढोबळ) किंमतीच्या अंदाजपत्रकास शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेचा समावेश राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या सन2018-19 व 2019-20 च्या मंजूर कृती आराखड्यामध्ये करण्यात आला आहे. या प्रस्तावित योजनेसाठी  निरा डावा कालवा (साठवण तलाव) हा स्त्रोत निवडण्यात आला असून या योजनेत साठवण तलाव घेण्‍यात आला आहे. अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी आज दिली. या योजनेद्वारे 40 लिटर प्रती माणसी पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे.

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या सन २०१९-२० च्या मंजूर कृती आराखड्यामध्ये या योजनांचा समावेश करण्यात आला आहे.