नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दावोस इथं होणाऱ्या जागतिक आर्थिक मंचाच्या शिखर परिषदेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमात विविध देशांचे प्रमुख हवामान बदल, परस्पर संबंध आणि लसीकरण यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांशी सबंधित त्यांचा दृष्टीकोन आणि योजना मांडणार आहेत. यात जपानचे प्रधानमंत्री फुमिओ किशिदा, युरोपियन आयोगाचे अध्यक्ष उर्सुआ वॉन डेर लेएन, ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन, इस्रायलचे प्रधानमंत्री नाफ्ताली बेनेट, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचा समावेश आहे.