नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं आज १६२ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला. आज सकाळपासून देशभरात १६ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. देशात आत्तापर्यंत १६२ कोटी ८ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. यापैकी ६८ कोटी ३५ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना दोन मात्रा, तर सुमारे ७७ लाख ५५ हजार  लाभार्थ्यांना लसीची वर्धक मात्रा मिळाली आहे. १५ ते १८ या वयोगटात आत्तापर्यंत ४ कोटी १७ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा मिळाली आहे. राज्यात आज सकाळपासून सुमारे १९ हजार नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे राज्यात आतापर्यंत दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १४ कोटी ६० लाख ६३ हजाराच्या वर गेली आहे. त्यात ५ कोटी ९७ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना दोन मात्रा, तर ६ लाखापेक्षा जास्त पात्र लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. १५ ते १८  वर्ष वयोगटातल्या २९ लाख ३५ हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी लशींची पहिली मात्रा मिळाली आहे.