पुणे :पुणे जिल्ह्यातल्या पर्यटन स्थळांवरची दुकानं काही अटींवर पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठकीनंतर पत्रकारांना दिली. लसींच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या दुकानदारांनाच दुकानं उघडता येणार आहेत. तसंच भीमाशंकर आणि अष्टविनायक मंदिरं भाविकांसाठीही खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीची वर्धक मात्रा देण्यासाठी शनिवारी आणि रविवारी विशेष मोहीम राबवण्यात येईल असंही ते म्हणाले. लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या खेळाडूंसाठी जिल्ह्यातले जलतरण तलाव खुले करण्याचा निर्णय झाल्याचंही पवार यांनी यावेळी सांगितलं.