नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १६७ कोटी ४१ लाखापेक्षा जास्ता मात्रा लाभार्थ्यांना मिळाल्या आहेत. त्यात ७१ कोटी ५६ लाखापेक्षा जास्त नागरिकांना लशींच्या दोन मात्रा मिळाल्या आहेत, तर १ कोटी २५ लाखापेक्षा जास्त पात्रा लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या ४ कोटी ८५ लाख ७४ हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांना लशीची पहिली मात्रा मिळाली आहे. राज्यात आज सकाळपासून ९४ हजारापेक्षा जास्त नागरिकांच लसीकरण झालं आहे. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १४ कोटी ८६ लाख ३३ हजाराच्यावर गेली आहे. त्यात ६ कोटी १३ लाख ५२ हजारापेक्षा जास्त नागरिकांना लशीच्या दोन मात्रा मिळाल्या आहेत. तर, सुमारे साडेनऊ लाख पात्र लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे.