नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधक लसीकरणामुळे मृत्युंचं आणि रुग्णालयात उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी झाली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली. कोरोनाच्या तीसऱ्या लाटेत लसीकरणानं महत्त्वाची भुमीका बजावली. लस घेतलेले 99 टक्के नागरिक सुरक्षित आहेत, असंही ते म्हणाले. 21 जानेवारी पासून कोरोना आलेख सतत खाली येत आहे. लसीकरणासाठी दुसऱ्या टप्प्यात 23 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

15 वर्षा खालच्या लसीकरणाबाबत तज्ञांच्या सल्ल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं कोरोनामुळे झालेला एकही मृत्यू लपवलेला नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी आज राज्यसभेत पुरवणी मागण्यांवर विचारलेल्या उत्तरात दिली. राज्यं आणि केंद्रशासीत प्रदेशांनी दिलेल्या आकडेवारी नुसार देशात आतापर्यंत कोरोनामुळे 5 लाख 33 हजार मृत्युंची नोंद झाली आहे. कोरोना काळात आघाडीवर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी दिलेल्या योगदानावर त्यांनी या कर्मचाऱ्यांचे आभार मानले.