नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक व्यापारातलं स्थान आणखी बळकट करण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य कराराच्या कक्षा रुंदावण्यासाठी एकत्र येत आहेत, अशी माहिती केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी दिली.

ते काल ऑस्ट्रलियाचे व्यापार आणि वाणिज्यमंत्री डॅन टेहान वॅनन यांच्या स्वागतासाठी नवी दिल्ली इथं आयोजित एका विशेष कार्यक्रमात बोलत होते. दोनही देश परस्परांच्या हिताच्या प्रमुख क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी येत्या 30 दिवसांत करारावर स्वाक्षऱ्या करतील, असंही ते म्हणाले.