नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ह्युस्टन, टेक्सास येथे काश्मिरी पंडितांच्या प्रतिनिधी मंडळाची भेट घेतली.

यावेळी समुदायातील सदस्यांनी, पंतप्रधानांनी भारताच्या प्रगतीसाठी आणि प्रत्येक भारतीयाच्या सक्षमीकरणासाठी उचललेल्या पावलांचे जोरदार समर्थन केले.

“मी ह्युस्टन येथे काश्मिरी पंडितांसोबत विशेष संवाद साधला.” असे पंतप्रधानांनी ट्विटर वरील संदेशात म्हटले आहे.