मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ८२ शतांश टक्के झालं असून, अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या २५ हजाराच्या खाली आली आहे. राज्यात काल २ हजार ७९७ नव्या रुग्णांची नोंद झाली. ६ हजार ३८३ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर ४० रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ७८ लाख ५३ हजार २९१ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ७६ लाख ८१ हजार ९६१ रुग्ण बरे झाले. तर १ लाख ४३ हजार ५३२ रुग्ण दगावले. सध्या राज्यात २३ हजार ८१६ अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. राज्यात काल ओमायक्रॉनचा संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळला नाही. राज्यात आतापर्यंत एकूण ४ हजार ४५६ ओमायक्रॉनबाधीत रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी आतापर्यंत ३ हजार ४५५ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी कोरोनामुळं एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. काल २५९ नवे रुग्ण आढळले, तर ४२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. मुंबईत सध्या ८५८ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यापैकी ४२८ जणांना ऑक्सिजनची गरज जाणवते आहे.