नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्याच्या सद्यस्थिती बाबत लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. या संदर्भात सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयानं सुचना देउनही पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले नाहीत.
राज्यात एकूण १ हजार ८९ पोलीस ठाणी असून आतापर्यंत ६ हजार ९२ कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यातले ४५३ कॅमेरे नादुरुस्त झाले आहेत. बऱ्याच प्रकरणात न्यायलयानं सीसीटिव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज मागवले होते, पण पोलिसांनी ते सादर करायला असमर्थता दर्शवली होती, म्हणून न्यायालयानं हे निर्देश दिले आहेत.