ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा घेणार : डॉ. कैलास कदम
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहराची ओळख देशभर औद्योगिक नगरी आणि कामगार नगरी म्हणून आहे. पिंपरी चिचंवडमध्ये क्रीडा क्षेत्रासाठी पायाभूत सुविधा कॉंग्रेस पक्षाने निर्माण केल्या आहेत. आता शहराची क्रीडा नगरी म्हणून ओळख निर्माण होण्यासाठी ॲम्येच्युअर ॲथलेटिक्स असोसिएशन ऑफ पिंपरी चिंचवडच्या वतीने प्रयत्न करणार आहे. लवकरच असोसिएशन माध्यमातून शहरात आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा घेणार आहे. तसेच शहरातील क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक आणि खेळाडूंना सन्मान मिळवून देणार असल्याचे प्रतिपादन ॲम्येच्युअर ॲथेलेटिक्स असोसिएशन ऑफ पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले.
ॲम्येच्युअर ॲथेलेटिक्स असोसिएशन ऑफ पिंपरी चिंचवड आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण, शिक्षक महामंडळाच्या वतीने रविवारी पिंपरीतील नवमहाराष्ट्र विद्यालयात शहरातील क्रीडा प्रशिक्षक आणि शिक्षकांचे मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. याच्या समारोप प्रसंगी सहभागी प्रशिक्षकांना ‘क्रीडा गुण गौरव पुरस्कार’ डॉ. कैलास कदम यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष मधू देसाई, राजन चिटणीस, शशी लांडगे, गणेश कुदळे, निवृत्ती काळभोर, सचिव किशोर शिंदे, सहसचिव ॲड. पौर्णिमा जाधव, ज्ञानेश्वर मलशेट्टी, खजिनदार प्रमोद मोरे, सहखजिनदार दिपाली देशपांडे, कार्यकारीणी सदस्य रमेश कुदळे, रविंद्र बो-हाडे आदींसह पिंपरी चिंचवड शहरातील क्रीडा, प्रशिक्षक व शिक्षक उपस्थित होते.
प्रतिमा शितोळे, अभिजीत गव्हाणे, प्रविण पाल, बाळासाहेब हेगडे, उमा काळे, रविंद्र गारगोटे, रविंद्र पिल्ले, हर्षदा नळकांडे, लक्ष्मण नाईक, रामदास लांघी, निखिल पवार, निलेश कोल्हे, प्रिया कांबळे, आशिष मालूसरे, निशा गुप्ता, सारीका भालेकर, संदेश साकोरे, अमित पवार, पवन लोहार, स्वप्निल गोसावी, राकेश थापा, गजानन पाटील, राजेंद्र कांबळे, राजेश प्रसाद, राम मुदगल आदींचा ‘क्रीडा गुण गौरव पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी डॉ. कैलास कदम म्हणाले की, कॉंग्रेस पक्षाने नेहमीच शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील मार्गदर्शकांचा सन्मान केला आहे आणि या क्षेत्राला प्रोत्साहन दिले आहे. पिंपरी चिंचवड शहरातून देखिल राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण होऊ शकतात. त्यासाठी खेळाडूंना, क्रीडा प्रशिक्षकांना भेडसावणा-या समस्या दुर झाल्या पाहिजेत. ज्या प्रमाणे गरजू विद्यार्थ्यांना ‘विद्यार्थी दत्तक – पालक योजनेतून’ अर्थसहाय्य दिले जाते. तसेच अर्थसहाय्य पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आणि राज्य सरकारने खेळाडूंना व क्रीडा प्रशिक्षकांना द्यावे यासाठी पुढील महिन्यात क्रीडा मंत्री सुनिल केदार यांना शिष्टमंडळासह भेटून प्रयत्न करु असेही डॉ. कैलास कदम म्हणाले.