नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ईजिप्तमधे कैरो इथं आयोजित आंतरराष्ट्रीय क्रीडा संघाच्या विश्वचषक स्पर्धेत भारताच्या सौरभ चौधऱीनं नेमबाजीत पहिलं सुर्वणपदक पटकावलं आहे. १९ वर्षांच्या सौरभनं काल पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तुल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जर्मनीच्या मायकेल श्वाल्डवर १६-६ ने विजय मिळवला. रशियाच्या आर्टेम चेर्नोसोवनं कांस्य पदक पटकावलं. काल भारताची श्रेया अग्रवाल १० मीटर एअर रायफल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवू शकली नाही. तिची संधी थोडक्यात हुकली. श्रेयानं एकूण ६३९ पूर्णांक ३ दशांश गुण मिळवले. उपांत्या फेरीत स्थान मिळवणाऱ्या हंगेरीच्या ऐज़तर मेस्ज़ारोस पेक्षा तिला केवळ एक दशांश गुण कमी पडले.