29 सप्टेंबर अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख

नागपूर : केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालया अंतर्गत स्वायत्त संस्था असलेरल्या अमरावती स्थित भारतीय जनसंचार संस्थेत शैक्षणिक सत्र 2019-20 करिता प्रवेश घेण्याची अंतीम संधी संस्थेद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली असुन इच्छूक उमेदवार 29 सप्टेंबर 2019 पर्यंत अर्ज सादर करु शकतात.

संस्थेच्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसराच्या केंद्रामध्ये इंग्रजी पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी 2 जागा उपलब्ध असून, यापैकी प्रत्येकी एक जागा अनुसूचित जाती व अनुसुचित जमाती करिता राखीव आहे. मराठी पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी एकूण सहा जागा उपलब्ध असून, त्यापैकी तीन खुल्या प्रवर्गासाठी असुन प्रत्येकी एक अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती व आर्थिक दृष्टया दूर्बल प्रवर्गासाठी राखीव आहेत.

सदर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी उमेदवार हा कुठल्याही शाखेचा पदवीधर असावा व खुल्या संवर्गातील असल्यास 1 ऑगस्ट 1994 वा त्यानंतर जन्म झालेला असावा. अनुसूचित जाती व अनुसुचित जमातीचा उमेदवार हा 1 ऑगस्ट 1989 वा त्यानंतर जन्म झालेला असावा तर  इतर मागासवर्ग प्रवर्गातील उमेदवार हा 1 ऑगस्ट 1991 वा त्यानंतर जन्म झालेला असावा.

इच्छुक व पात्र उमेदवारांनी स्वतः आपले अर्ज व शैक्षणिक गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र आणून 29 सप्टेंबर 2019 रोजी संस्थेच्या अमरावती केंद्रात सादर करावे. अधिक माहितीसाठी प्रा. विनय सोनुले (9422118895) अथवा राजेश झोलेकर (098813 88645) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन भारतीय जनसंचार संस्था, अमरावतीतर्फे करण्यात आले आहे.