नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनमध्ये उद्भवलेल्या मानवतावादी संकटासाठी रशियाला दोषी ठरवणारा ठराव संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेत काल मंजूर झाला. त्याबरोबरंच युक्रेनमध्ये तात्काळ युद्धविराम करण्याचंही आवाहन केलं. १४० देशांनी या ठरावाच्या बाजूनं आणि ५ देशांनी ठरावाच्या विरोधात मतदान केलं तर ३८ देश मतदानापासून अलिप्त राहिले. शत्रुत्वाच्या भावना संपवणं यांवर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. या भागात तातडीची मानवतावादी मदत गरजेची आहे, असं सांगून भारतानं या ठरावावर मतदान केलं नाही.

संयुक्त राष्ट्रांतले भारताचे स्थायी प्रतिनिधी, टी.एस तिरुमूर्ती म्हणाले की, भारतानं युक्रेन आणि त्याच्या शेजारी राष्ट्रांना आत्तापर्यंत ९० टन आवश्यक  साहित्याचा पुरवठा केला आहे.  हा संघर्ष कमी करण्यासाठी, शत्रुत्व  बंद करण्यासाठी, संवाद आणि मुत्सद्देगिरीला चालना देण्यासाठी आणि पीडीत लोकांच्या दुःखाचा तात्काळ अंत शोधण्यासाठी दोन्ही पक्षांना एकत्र आणण्यासाठी संयुक्त राष्ट्रानं प्रयत्न करणं गरजेचं आहे, असंही भारताचं मत आहे.