पिंपरी : टपाल कामगार संघटनांनी विविध मागण्यांसाठी दिनांक 28 व 29 मार्च 2022 रोजी केंद्र सरकारच्या विरोधात देशव्यापी संप पुकारला. या संपामध्ये पिंपरी चिंचवड मधील टपाल कामगारांच्या सर्व मान्यताप्राप्त संघटनांसह इतर खाजगी व सरकारी संघटना सहभागी झाल्या होत्या.
चिंचवड ईस्ट पोस्ट ऑफिस चिंचवड स्टेशन या ठिकाणी टपाल कर्मचाऱ्यांनी आंदोलन करून त्या ठिकाणी सभा झाली. त्या सभेमध्ये संघटनेचे प्रतिनिधी के. एस. पारखी, राजेंद्र करपे, देवदास देवकर, अनिल खांडेकर, भरत बागडे, विनायक सांगडे, नितीन बने, रमेश कांबळे, सतीश जगताप, दत्तात्रेय कोंढाळकर, विनय खेडेकर, इत्यादींनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून आपल्या मागण्यांसंदर्भात माहिती दिली.
टपाल विभागाचे खाजगीकरण थांबवा. सन 2004 नंतर नेमणूक झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा. डाकमित्र योजना बंद करा. सर्व रिक्त जागा भरा व कर्मचाऱ्यांची पिळवणूक थांबवा. कोव्हीडच्या साथीमुळे मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांची मदत देऊन त्यांच्या घरातील एका व्यक्तीला कामावर घेण्यात यावे. ग्रामीण डाक सेवक कर्मचाऱ्यांसाठी कमलेश चंद्र कमिटीच्या उर्वरित शिफारशी त्वरित मान्य करा. संघणक सर्व्हरची क्षमता वाढवा इत्यादी मागण्या टपाल विभागातील संघटनेने केंद्र सरकारकडे केल्या आहेत.
यावेळी याठिकाणी श्री विष्णू गायकवाड ग्रामीण डाक सेवक संघटनेचे सेक्रेटरी, रामदास वाकडकर ग्रामीण डाक सेवक संघटनेचे अध्यक्ष, दत्तात्रय कोंढाळकर नॅशनल असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष, विनय खेडेकर नॅशनल युनियन पोस्टमन संघटनेचे अध्यक्ष, तसेच वर्षा जाधव, राजश्री गुरव, दीपक भदाणे, प्रवीण मदने, चंद्रशेखर चव्हाण, अशोक अवघडे, मोहन जोशी, पप्पू विपत, बालाजी कामलिंगे, जयदेव थोरात, बाळू भाटे, ईश्वर बुचडे, राहुल पवार, अनिल बडे ,अनिल मेहेरखांब, रमेश शेलार, महंमद सय्यद, संजय आवळे, मनोज राठोड, मयुर बोरडे, मनोज यैणिले, बाबुराव कांबळे, शंकर पारठे, बाबुराव बारगळ, राहुल कुलथे, सर्वजीत धंदर, इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.
के. एस. पारखी रिजनल सेक्रेटरी नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज, राजेंद्र करपे सर्कल सेक्रेटरी नॅशनल युनियन ऑफ ग्रामीण डाक सेवक, देवदास देवकर रिजनल सेक्रेटरी नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज पोस्टमन व एम. टी. एस. यांनी अशी माहिती दिली.