नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांच्या सरकारविरोधात उद्या अविश्वास ठराव मांडला जाणार आहे. त्याआधी आज पाकिस्तानमधे सत्ताधारी तहरीक ए इन्साफ पार्टीची सहयोगी जमूरे वतन पार्टीचे सदस्य शाहाजेन बुग्ती यांनी राजीनामा दिला, आणि ते विरोधी पक्ष पाकिस्तान डेमोक्रेट्रीक मोमेन्ट मध्ये सामील झाले आहेत. बलुच चळवळीचे प्रणेते अकबर बुग्तीचे ते नातू आहेत. प्रधानमंत्री इम्रान खान यांच्यासाठी हा मोठा झटका मानला जात आहे. बुग्ती प्रधानमंत्री इम्रान खान यांचे प्रमुख सल्लागार म्हणून काम करत होते. दरम्यान 50 पेक्षा अधिक संघीय आणि प्रांतीय सदस्यांचा ठाव ठिकाणा लागत नसल्यानं पाकिस्तान मध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. खान यांनी शक्ती प्रदर्शनासाठी इस्लामाबाद इथं रॅलीला संबोधीत केल्यानंतर बुग्ती यांनी राजीनामा दिला आहे.