नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंधन दरवाढ आणि इतर मुद्यांवर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. सकाळी लोकसभेचं कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी हौद्यात येऊन घोषणा द्यायला सुरुवात केली.
काँग्रेस खासदार अधिर रंजन चौधरी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना महागाईच्या मुद्यावर चर्चा घडवून आणण्याची विनंती केली. बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास काही वेळ सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी सुरुच ठेवल्यानं कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. दुपारी १२ नंतर कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतरही परीस्थिती जैसे थै असल्यानं अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज दुपारी २ पर्यंत तहकूब केलं.