नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक तापमान तीन डिग्री सेल्सिअसनं वाढणार असल्याचं संयुक्त राष्ट संघाच्या जागतिक तापमानाविषयक समितीनं जारी केलेल्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
पॅरिस करारात दीड डिग्री सेल्सिअसनं तापमान वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे. या समितीनं वर्तवलेला अंदाज दुप्पट आहे. जगभरात हरित गृहांमधून अमर्याद उत्सर्जन होणाऱ्या घातक विषारी वायू याला करणीभूत ठरणार असल्याचं या अहवालात स्पष्ट केलं आहे. यावर प्रत्येक क्षेत्रात उपाय आहे. एकत्रीतपणे कार्बन उत्सर्जनावर मात करता येण्याच्या संधी आहेत. कार्बन उत्सर्जन कमी होऊ शकतो हे जगातल्या १८ देशांनी सिध्दकेलं आहे, असंही हा अहवाल म्हणतो.