नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ढाका इथं आयोजित बंगला देश कनिष्ठ गट आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या मीराबा लुवांगनं पुरूष एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम सामन्यात त्यांना अग्रमानांकित मीराबानं मलेशियाच्या केन योंग ओंगला २१-१४, २१-१८ अशा सरळ गेममधे हरवलं.

महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या अग्रमानांकित ट्रीसा जॉलीला पराभव पत्कारावा लागला. थायलंडच्या क्रिटापोर्न जियानटेनेटनं ट्रीसाला २१-१२, १६-२१, २१-१६नं हरवून विजेतेपद पटकावलं