मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र हे महिलांना आदर सन्मान देऊन नेतृत्वाला संधी देणारे राज्य आहे. या राज्यातील महिलांच्या रक्तात आणि आत्म्यातच नेतृत्वगुण भिनला आहे, असं विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केलं.
महाराष्ट्रातल्या नवनिर्वाचित सदस्यांकरिता नवी दिल्लीमध्ये प्राइड संस्था आणि लोकसभा सचिवालय यांच्यावतीनं आयोजित केलेल्या प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. विधिमंडळ सदस्यांसाठी आयोजित केलेले प्रशिक्षण हे नक्कीच भावी प्रवासात मार्गदर्शक ठरेल, असंही त्या म्हणाल्या. या प्रशिक्षणाला महाराष्ट्रातून १०० पेक्षा अधिक नवनिर्वाचित विधिमंडळ सदस्यांनी हजेरी लावली आहे.