मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई हल्ल्यांचा मुख्य सूत्रधार आणि मजात उद दवाचा म्होरक्या हाफीज सईद याला पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने दहशतवादाला पैसा पुरवल्याच्या आणखी दोन प्रकरणांमध्ये 32 वर्षं कारावासाची शिक्षा सुनावली. यापूर्वीच्या 5 प्रकरणांमध्ये सुनावण्यात आलेली 36 वर्षांची शिक्षा लक्षात घेता त्याची एकंदर शिक्षा 68 वर्षांची आहे. पंजाब पोलिसांच्या दहशतवादविरोधी विभागाने नोंदवलेल्या दोन तक्रारींच्या आधारे न्यायमूर्ती एजाज अहमद भुट्टर यांनी हाफिज सईदला 32 वर्षांचा कारावास आणि 3 लाख 40 हजार पाकिस्तानी रुपयांचा दंड ठोठावला. संयुक्त राष्ट्रांच्या यादीतला कुख्यात दहशतवादी असलेल्या हाफीज सईदवर 1 कोटी अमेरिकी डॉलर्सचं इनाम आहे.