पुणे : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2019 करीता जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रांसाठी निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. हे निरिक्षक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय खर्च निरिक्षकांची नावे व त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक अनुक्रमे असे आहेत. या सर्व निरिक्षकांची निवास व्यवस्था व्हीव्हीआयपी सर्कीट हाऊसपुणे येथे करण्यात आली आहे.

जुन्नरआंबेगाव  खेड आळंदीसाठी श्री. पिजूष मुखर्जीभ्रमणध्वनी – 9404541959निवास व्यवस्थाबी-105 येथे आहे. शिरूर, दौंड व इंदापुरसाठी श्री. रोशन लालभ्रमणध्वनी-9404542504, निवास व्यवस्था-बी-201 येथे आहे. बारामतीपुरंदर व भोरसाठी श्री. अमलेंदू नाथ मिश्राभ्रमणध्वनी-9404540280, निवास व्यवस्था- बी-202 येथे आहे.

मावळ व चिंचवडसाठी श्री. रोहित मेहराभ्रमणध्वनी– 9404542546, निवास व्यवस्था-बी-103 येथे आहे. पिंपरी व भोसरीसाठी श्री. अमरसिंग नेहराभ्रमणध्वनी-9404541239, निवास व्यवस्था बी-101 येथे आहे. वडगाव शेरीपुणे कॅन्टोन्मेंटसाठी श्री. किरण कटटाभ्रमणध्वनी-9404541610, निवास व्यवस्था-बी- 203 येथे आहे. शिवाजीनगर,कोथरूड व खडकवासलासाठी श्री. विजय चौधरीभ्रमणध्वनी-9404541631, निवास व्यवस्था-बी- 205 येथे आहे. पर्वतीहडपसर व कसबा पेठसाठी श्री. सैलेन समादर भ्रमणध्वनी 9404539878, निवास व्यवस्था-बी-102 येथे आहे.

तरी मतदारांना निवडणूकी संदर्भात काही तक्रारी अथवा अडचण मांडावयाची असल्यास निवडणूक खर्च निरीक्षकांशी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नवल किशोर राम व उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी कळविले आहे.