नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विरोधी लढाईत लसीकरण हेच महत्वपूर्ण कवच असल्याचा उल्लेख प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे. देशातल्या काही भागात कोरोना रुग्णाच्या वाढत्या संख्येच्या पार्शवभूमीवर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आयोजित कोरोना आढावा बैठकीनंतर ते बोलत होते.

इतर देशांच्या  तुलनेत  भारतानं कोविड परिस्थिती योग्य रित्या हाताळल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. मात्र, कोरोनाच संकट अजून टळलं नसल्यानं सर्वानी दक्ष राहण्याची सूचना त्यांनी केली. कोरोना विरोधी लढाईत लसीकरणामुळे महत्वपूर्ण विजय मिळाला असल्याचं ते म्हणाले. आरोग्य मंत्रालयानं भौगोलिक आव्हानांनाचाही सामना करत लसीकरण सुरु ठेवल्याबद्दल त्यांनी सर्वांचं कौतुक केलं.

देशात सर्वत्र शाळा सुरु होत आसतनाच रुग्णांचा प्रमाण वाढत असल्यामुळे पालक चिंतीत आहेत. मात्र, ६ वर्षांवरच्या सर्व पात्र लहान बालकांचं लसीकरण लवकरच सुरु होतं असल्यानं त्यांनाही कवच लाभेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.