मुंबई (वृत्तसंस्था) : पहिला डॉ. शंकरराव चव्हाण जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांना प्रदान करण्यात आला. कोरोना काळात संशोधनाच्या माध्यमातून दिलेल्या योगदाना बद्दल त्यांना हा पुरस्कार आला, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.  मराठवाड्यातला आपला भूमिपुत्र कोरोना सारख्या आजाराच्या संशोधनासाठी, या पुरस्काराचाही गौरव झाल्याचं चव्हाण म्हणाले. समाजातली असमानता आणि आरोग्याच्या प्रश्नावर नेटानं काम करण्यासाठी पुरस्कारातून प्रेरणा मिळते, असं गंगाखेडकर यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली.कोणी सन्मान केला की जबाबदारीमध्ये आणखी वाढ होईल याची एक नकळत धास्तीही राहते, असंही ते म्हणाले.