मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयनं १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यात कथितरित्या सहभागी असलेल्या चार जणांना ताब्यात घेतलं आहे. १२ मे रोजी गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकानं या चौघांना ताब्यात घेतलं होतं.

१२ मार्च १९९३ मधील या भीषण साखळी बॉम्बस्फोटांमध्ये २५७ लोक मारले गेले होते; ७०० हून अधिक जखमी झाले. या दहशतवादी हल्ल्यानंतर सुमारे तीस वर्षांनी हे आरोपी पकडण्यात आले आहेत.