मुंबई (वृत्तसंस्था) : पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी शहरात मूलभूत सोयी – सुविधांच्या अनुषंगानं निर्माण होणाऱ्या समस्या आणि अडचणी संदर्भात पुणे विभागीय आयुक्त मा. डॉ. सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली आणि पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या उपस्थितीत पंढरपूर इथं आढावा बैठक पार पडली. भाविकांच्या आरोग्य दृष्टीनं औषध – गोळ्या यांचा मुबलक साठा उपलब्ध करून देणं, स्वच्छतेच्या अनुषंगानं सार्वजनिक शौचालयांचं प्रमाण वाढविणं, येणाऱ्या भाविकांना पिण्यासाठी स्वच्छ आणि शुद्ध पाणी उपलब्ध व्हावं, अशा प्रश्नांवर बैठकीत चर्चा झाली.