नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अग्निपथ मोहिमे अंतर्गत अग्निवीरांची होणारी निवड निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीनं केली जाईल, अशी माहिती लष्करी व्यवहार विभागाचे सचीव लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी दिली. ते आज नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलत होते.

भारतीय वायू सेनेतली भरती प्रक्रिया या महिन्याच्या २४ तारखेपासून सुरू होईल. तसंच लष्कर आणि नौसेनेसाठीची भरती प्रक्रिया पुढच्या महिन्याच्या एक तारखेपासून सुरू होईल. यातल्या भरती प्रक्रियेत कोणताही बदल केला जाणार असंही त्यांनी स्पष्ट केलं.

भारतीय संरक्षण विभागाचा चेहरा युवा करण्यासाठी अग्निपथ योजना आणली आहे. तंत्रज्ञान प्रगत आणि भविष्यासाठी तयार अग्निवीरांची निर्मिती केली जाईल. यासाठी 23013865 हा मदत क्रमांक त्यांनी जारी केला. वायुसेनेसाठीची लेखी परीक्षा पुढच्या महिन्याच्या २४ ते ३१ दरम्यान होईल, अशी माहिती एअर मार्शल सुरज कुमार यांनी दिली.