नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय स्तरावरच्या सनदी लेखापाल अर्थात चार्टर्ड अकौंटन्ट (सीए) परीक्षेत मुंबईच्या मीत शहा यानं देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. मीत शहाला ८० पूर्णांक २५ शतांश टक्के गुण मिळाले. आयसीएआय अर्थात इस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्टस ऑफ इंडियानं मे २०२२ मधे झालेल्या सीए अंतिम परीक्षेचा निकाल आज जाहीर केला. जयपूरचा अक्षत गोयल दुसरा तर सुरतची सृष्टी संघवी तिसरी आली. एक लाख १८ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यापैकी एकूण १२ हजार ४४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीतचं अभिनंदन केलं आहे.