नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीटीईटी अर्थात केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा येत्या डिसेंबरमध्ये घेण्यात येणार आहे. परीक्षेची नेमकी तारीख नंतर जाहीर केली जाईल. परीक्षेची ही सोळावी आवृत्ती असून देशभऱात 20 भाषांमध्ये ती आयोजित करण्यात येणार आहे. सीबीटी अर्थात संगणकाधारित चाचणी असं या परीक्षेचं स्वरूप असेल, असं केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं स्पष्ट केलं आहे.

परीक्षेचे इतर तपशील, अभ्यासक्रम, पात्रता निकष, परीक्षार्थी, परीक्षा केंद्रं आणि इतर महत्त्वाच्या तारखा ctet.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध होतील. इच्छुक उमेदवारांनी, अर्ज भरण्यापूर्वी ही सर्व माहिती या संकेतस्थळावरूनच डाऊनलोड करुन काळजीपूर्वक वाचून घ्यावी, अशी सूचना मंडळानं केली आहे.