नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारतर्फे अप्रमाणित अन्नधान्य आणि डाळींवर नव्यानं पाच टक्के जीएसटी लावला जाणार असल्य़ाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या छोट्या व्यापाऱ्यांनी आज एक दिवसाचा लाक्षणिक संप  पुकारला आहे.

२०१७ मध्ये जीएसटी लागू केल्यानंतर अप्रमाणित अन्नधान्य आणि डाळींवर जीएसटी लागू केला जाणार नसल्याचं केंद्र सरकारनं सांगितलं होतं. शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना जीएसटीमुळे आर्थिक झळ सोसावी लागत असल्यानं सरकारच्या जीएसटी वाढीच्या विरोधात संप पुकारल्याची माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे.