नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी चांगली कामगिरी केली असून. साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि दीपक पुनिया यांनी कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीन्ही सुवर्णपदक विजेत्यांचं अभिनंदन केलं असून आगामी स्पर्धांमध्ये त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे की, साक्षी मलिक ही भारतीय मुलींसाठी रोल मॉडेल असून, या महिला खेळाडूंमुळे  भारतवासीयांची मान अभिमानानं उंचावली जाते. उपराष्ट्रपति एम. वैंकेया नायडूने म्हणाले की, राष्ट्रकुल खेळांमध्ये टीम इंडिया सतत उत्कृष्ट प्रदर्शन करत असल्यानं हा चमु अभिनंदनास पात्र आहेत. राष्ट्रकुल क्रीडा स्तरावर सतत तिसऱ्या वेळी शानदार प्रदर्शन करणाऱ्या बजरंग पुनिया बद्दल बोलताना प्रधानमंत्री म्हणाले की, कठीण परिश्रम आणि इच्छाशक्तीच्या जोरावर दिपक पुनियानं आपलं श्रेष्ठत्व सिद्ध केलं आहे. त्यांनी देशाचं नाव गौरवल्याबद्दल दीपक पुनियाची प्रशंसा केली तसचं  आगामी खेळांसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहे.