पीएमएनआरएफमधून पिडीतांसाठी सानुग्रह अनुदान केले जाहीर

नवी दिल्ली : पूंछ येथील रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातग्रस्तांसाठी  त्यांनी पीएमएनआरएफ अर्थात पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून सानुग्रह अनुदान देण्याची घोषणादेखील केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने पाठविलेल्या ट्विट संदेशात म्हटले आहे;

“पूंछ येथील रस्ते अपघातात लोकांचा मृत्यू होणे वेदनादायी आहे.  अपघातात आपल्या प्रियजनांना गमावून बसलेल्या नागरिकांच्या दुःखात सहभागी आहे. या अपघातात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी मी प्रार्थना करतो. या अपघातात मृत्यू पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जवळच्या वारसाला  पीएमएनआरएफ मधून दोन लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये देण्यात येतील :पंतप्रधान

The loss of lives due to an accident in Poonch is saddening. My thoughts are with all those who lost their loved ones. Wishing the injured a speedy recovery. Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased and Rs. 50,000 would be given to the injured: PM