नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :भारत हा श्रीलंकेचा सर्वाधिक कर्ज पुरवठा करणारा देश ठरला आहे. चालू वर्षात भारतानं श्रीलंकेला ९६८ बिलियन अमेरिकन डॉलर्स कर्ज दिलं. २०१७ ते २०२१ या पाच वर्षात श्रीलंकेला सर्वाधिक कर्ज देणारा देश चीन होता.
भारतानं आतापर्यंत श्रीलंकेला आर्थिक तसंच धान्य अश्या स्वरुपात ४ अब्ज अमेरिकन डॉलर्स किमतीची मदत केली आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्रसंघातल्या भारताच्या प्रतिनिधी रुचिरा कंभोज यांनी दिली. जानेवारीपासून श्रीलंका आर्थिक आरिष्टात सापडला आहे. या देशातल्या जनतेला अन्न टंचाई तसंच इंधन टंचाईचा सामना करावा लागत आहे, अश्या परिस्थितीत भारतानं या देशाला मदतीचा हात देत भरघोस मदत पुरवली आहे.