नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज शिलाँगमध्ये जाहीर सभेला संबोधित केलं. भागवत दोन दिवसांच्या मेघालय दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात ते संघाचे विविध पदाधिकारी आणि सामाजिक-सांस्कृतिक नेतृत्वासोबतच्या त्यांच्या भेटींचा समावेश असेल. भारत हे राष्ट्र सामर्थ्यवान आणि समृद्ध झाले तर प्रत्येक भारतीयही सामर्थ्यवान आणि समृद्ध होईल असं ते म्हणाले. भागवत यांनी सभागृहात उपस्थित असलेल्या विविध क्षेत्रातील श्रोत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रत्यक्ष सहभाग घेऊन निरीक्षणाने संघाचे विश्लेषण करावे असे सुचवले.