नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांचा सन्मान आपल्या संस्कृतीतच अंतर्भूत असून सरकारच्या प्रत्येक योजनेच्या केंद्रस्थानी महिलाशक्ती असल्याचं  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. गुजरातमधल्या अंबाजी इथं ६ हजार ९०० कोटी रूपयांच्या  प्रकल्पांचं उद्धाटन आणि पायाभरणी केल्यानंतर एका जाहीर सभेत ते बोलत होते. हे प्रकल्प या प्रदेशाचा कायापालट करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश यावेळी उपस्थित होते.

गांधीनगर इथं अहमदाबाद मेट्रो योजनेच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटनही आज प्रधानमंत्र्याच्या हस्ते झालं. मुंबई – अहमदाबाद अंतर पाच तासात कापणाऱ्या वंदे भारत या रेल्वेगाडीलाही त्यांनी यावेळी हिरवा झेंडा दाखवला.