नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत रुपे पेमेंट पध्दतीचा अवलंब करण्यासाठी विविध देशांशी चर्चा करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज वॉशिंग्टन इथं सांगितलं.  त्या एका प्रमुख थिंक टँकने  आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. सीतारामन पुढे म्हणाल्या की सिंगापूर आणि संयुक्त अरब अमिरातींनी रुपे पध्दतीमध्ये रुची दाखविली असून  युपीआय, भीम ऍप आणि  नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया  हे सर्व आता इतर देशांतील प्रणालींशी बरोबरी गाठण्यासाठी  विकसित केले जात आहेत.आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीसाठी अर्थमंत्री अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत.