नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रिय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्या दोन दिवसांच्या रशिया दौऱ्याची सुरुवात आजपासून होत आहे.भारत आणि रशियादरम्यान नियमित उच्च स्तरीय बैठकीचा हा एक भाग आहे. या दौऱ्यादरम्यान रशियाचे परराष्ट्र व्यवहारमंत्री सरगई लेव्हरोव्ह यांच्याशी ते चर्चा करतील. दोनही देशांदरम्यानचे द्विपक्षीय संबंध, विविध प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विकासाशी संबंधित मुद्यांवर चर्चा अपेक्षित आहे. याबरोबरच रशियाचे उपपंतप्रधान तसंच रशियाचे व्यापार आणि उद्योगमंत्री डेनिस मँटुरोव्ह, भारत रशिया दरम्यान असलेल्या व्यापार, आर्थिक, विज्ञान, तंत्रज्ञान, आणि सांस्कृतिक सहकार्यासाठीचा आयोगातील सदस्याशी चर्चा करणार आहेत.