नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपानमध्ये सुरु असलेल्या G-20 ओकायामा आरोग्यमंत्री संमेलनात भारतानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ- सबका विकास- सबका विश्वास या घोषणेचा तसंच आयुष्यमान भारत आरोग्य योजनेचा विशेष उल्लेख केला आहे.
जपानमध्ये ओकायामा इथं सुरु असलेल्या या संमेलनात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन भारताचं प्रतिनिधित्व करत असून त्यांनी प्रधानमंत्री मोदी यांच्या फिट इंडिया मूव्हमेंट आणि ईट राइट केंपैन या योजनांचा उल्लेख केला.
सर्वसमावेशक आरोग्य सेवा पुरवण्यावर भारताचा भर असल्याचं डॉ. हर्षवर्धन यांनी यावेळी सांगितलं. ज्येष्ठ नागरिकांच्या वाढत्या लोकसंख्येसाठी परवडण्याजोगी, सहज उपलब्ध आणि दर्जेदार सेवा देण्याचा भारताचा प्रयत्न असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.