मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या सीमावर्ती भागातल्या गावांची नाराजी कमी करण्यासाठी किमान त्या परिसरातल्या विकासकामांवरची स्थगिती राज्य सरकारनं तातडीनं मागं घ्यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केली आहे.
ते आज मुंबईत, नांदेडसह सांगली, सोलापूर, नाशिक, नंदूरबार जिल्ह्यातील काही गावं लगतच्या राज्यांमध्ये समाविष्ट होऊ इच्छित असल्याच्या बातम्यांविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना बोलत होते. ही अतिशय गंभीर बाब असून, राज्य सरकारनं विनाविलंब पावलं उचलण्याची आवश्यकता आहे.
या गावांच्या प्रामुख्यानं विविध शासकीय योजना आणि पायाभूत सुविधांबाबत तक्रारी आहेत. राज्य सरकारनं त्यांचं निराकरण करण्याबाबत तात्काळ निर्णय घेतले पाहिजेत. अन्यथा महाराष्ट्र तोडू इच्छिणारे त्या नाराजीचा गैरफायदा घेतील, असा इशाराही अशोक चव्हाण यांनी यावेळी दिला.