नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरमधल्या महाविद्यालय आणि विद्यापीठांमधे कौशल्याधारित अभ्यासक्रमाचा समावेश करण गरजेचं आहे, असं जम्मू-कश्मीरच्या राज्यापालांचे सल्लागार खुर्शीद अहमद गनाई यांनी म्हटलं आहे. गनाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या  शिक्षण विभागाच्या उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते.

पदवी आणि पदव्युत्तर अभ्रासक्रमात बदल करून तो जागतिक स्तराचा करण्याचा विचार आहे, त्यामुळे राज्यातल्या युवकांना संधी प्राप्त होईल, असंही ते म्हणाले. पहिल्या टप्प्यात ५० ते ६० महाविद्यालयांचं आधुनिकीकरण केल जाईल, जेणेकरून अन्य महाविद्यालयं त्याचं अनुकरण करतील. उच्च अभ्यासक्रमामुळे राज्यातल्या युवकांना देशात तसंच परदेशात पदव्युत्तर शिक्षण घेण्याचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.