नवी दिल्ली : भारतीय हवाई दलानं जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या ब्राम्होस क्षेपणास्त्रांची अंदमान निकोबार द्वीपसमुहातल्या त्रक बेटावरून यशस्वी चाचणी केली आहे. काल एक  आणि परवा एक क्षेपणास्त्र सोडण्यात आलं.  हा नियमित अभ्यासाचा एक भाग आहे, असं हवाईदलानं केलेल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे.

३०० किलोमीटरवर एका लक्ष्याचा या क्षेपणास्त्रांनी अचूक वेध घेतला. या अभ्यासामुळे जमिनीवर मारा करण्याच्या  हवाईदलाच्या क्षमतेत वाढ झाल्याचंही या संदेशात म्हटलं आहे.