नवी दिल्ली : शारिरिक तंदुरुस्तीसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा परवडणा-या दरात आरोग्य सुविधा सुधारणा आणि दर्जेदार शिक्षण पुरवण्याला आपल्या सरकारच्या धोरणात प्राधान्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्ली इथं जेपी मॉर्गन इंटरनॅशनल कौन्सिलच्या बैठकीत बोलत होते.

2007 नंतर पहिल्यांदाच ही बैठक भारतात होत आहे. मॉर्गन कौन्सिलचं स्वागत केल्यानंतर प्रधानमंत्र्यांनी 2024 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था 5 लाख कोटी डॉलर्सची करण्यासाठीच्या आपल्या दृष्टीकोनाविषयी चर्चा केली. सरकारच्या धोरणनिश्चतीत लोकांचा सहभाग मार्गदर्शक ठरला आहे, असं त्यांनी सांगितलं.

या कौन्सिलमधे ब्रिटनचे माजी प्रधानमंत्री टोनी ब्लेअर ऑस्ट्रेलियाचे माजी परराष्ट्र जॉन हॉवर्ड अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री हेन्री किसिंजर आणि कोंडोलिझा राईस माजी संरक्षण मंत्री रॉबर्ट जेट्स यांच्यासारख्या जागतिक राजकारण धुरुंधर नेत्यांचा समावेश आहे.