मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या शैक्षणिक वर्षाच्या आधी राज्यात ३० हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सभागृहात दिली. हा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला होता. ही भरती प्रक्रिया खासगी आणि सरकारी अशा सर्व शाळांसाठी केली जात असून त्यासाठी दोन स्वतंत्र कंपन्या नेमण्यात आल्याची माहिती केसरकर यांनी दिली. कोकणात ओढ्या, नाल्यांवरचे साकव एकाच वेळी नव्यानं बांधून काढण्यासाठी केंद्राकडून सोळाशे कोटींचा निधी मिळवण्याचा प्रयत्न केला जात असून त्यात काँक्रिटचे छोटे पूल बांधले जातील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. पूर्वी हे साकव जिल्हा परिषदेमार्फत बांधले आणि दुरुस्त केले जात असत.